शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या होणाऱ्या आषाढी महोत्सव आणि बकरी ईद हे दोन्ही सण भाविकांनी अत्यंत उत्साहात आणि आनंदाने साजरे करावेत पण आपल्या आनंदाने इतरांच्या आनंदात विरजण टाकले जाणार नाही याची दक्षता सुध्दा भाविकांनी ठेवायला हवी अशी अपेक्षा नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्र्वभूमीवर शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आप-आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन केले.
उद्या दि.10 जुलै रोजी आषाढी महोत्सव आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. प्रत्येक भाविकाने आपला आनंद अत्यंत जोरदारपणे साजरा करावा परंतू आपल्या आनंदाने दुसऱ्याच्या आनंदात त्याचे विरजण पडणार नाही याची सुध्दा दक्षता घ्यावी असे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले. दोन वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन एकाच दिवशी घडणार आहे या प्रसंगाचा आनंदा घ्या. सध्याच्या परिस्थितीत पावसाने सुध्दा जोर मारलेला आहे. तेंव्हा आम्हाला पावासा मूळे तयार होणाऱ्या आपत्तीत एक दुसऱ्याची सुरक्षीतता पण पाहायची आहे. प्रशासन आपल्यावतीने जनतेच्या प्रत्येक अडचणीसाठी तयार आहे. तेंव्हा एक दुसऱ्याच्या संस्कृतीचा आनंद घेत काळजीपुर्वक आनंद साजरा करावा असे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले आहे.
नांदेड शहरातील भाग्यनगर,विमानतळ, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा आणि नांदेड ग्रामीण या भागातील प्रभारी पोलीस निरिक्षकांनी आपल्या पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बल गटाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन करून आनंदात विरजण टाकण्यासाठी मनात इच्छा बाळगणाऱ्यांना इशाराच दीला आहे.