नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय युवतीवर अनेकदा अत्याचार करून तिला लग्न करण्यासाठी बाध्य करणारा युवक शिवाजीनगर पोलीसांनी हैद्राबादच्या विमानतळावरून पळून जाण्याच्या तयारी असतांना पकडून आणला. त्यास प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी सौ.पी.एस.जाधव यांनी 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
2020 पासून एका कंपनीत नोकरी करणाऱ्या 20 वर्षीय युवतीला त्या कंपनीचा मालक दिपक चांदोबा कांबळे (30) याने वेगवेगळ्या कारणातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण ती युवती प्रतिसाद देत नव्हती. कंपनीचे काम आहे असे सांगून अनेकदा तिच्यासोबत केलेली सलगी तिला आवडी नाही. तरी पण दिपक कांबळेने आपला प्रयत्न सोडला नाही आणि आपले इप्सीत साध्य केले. नांदेड येथील एका हॉटेलमध्ये आणि मुंबईच्या पवई भागात त्या युवतीला नेऊन तिच्यासोबत अनेकदा अत्याचार केले. सोबतच लग्न झालेले असतांना त्या युवतीसोबत पुन्हा दुसरे लग्न करण्याची बळजबरी दिपक कांबळेने केली. याबद्दलची माहिती युवतीने दिपक कांबळेच्या पत्नीला दिली तेंव्हा ती सुध्दा त्या युवतीवरच रागवत होती. अखेर त्या युवतीने तक्रार दिली आणि दिपक चांदोबा कांबळेविरुध्द गुन्हा दाखल झाला.
शिवाजीनगर पोलीसांनी तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात असलेल्या राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्रिवेंद्रम (केरळ) कडे विमानाने पळून जाण्याच्या तयारी असणाऱ्या दिपक चांदोबा कांबळेला पकडले आणि नांदेडला आणले. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
आज दि.9 जुलै रोजी उमाकांत पुणे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी दिपक चांदोबा कांबळेला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायाधीश पी.एस.जाधव यांनी दि.12 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करून पोलीसांची मागणी मंजुर केली.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/07/09/20-वर्षीय-युवतीवर-अत्याचार/