नांदेड,(प्रतिनिधी)- खंडणी प्रकरणात अडकलेल्या अक्षय भानुसिंह रावतला आज न्यायालयाने तिसऱ्यांदा एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खंडणी मागणी प्रकरणाची तक्रार दत्तनगर भागात राहणारे सुदाम किशन राऊत यांनी दिली होती. त्या तक्रारीत अक्षय भानुसिंह रावत,राजू बिल्डर,अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर चार ते पाच जणांची नावे नमूद होती.हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे तपासासाठी देण्यात आलेला आहे.
आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हणमंत मिटके हे करीत आहेत. पोलिसांनी पहिल्यांदा अक्षय रावतलाच ५ जुलै रोजी अटक केली. त्यावेळी न्यायालयाने अक्षय रावतला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले.पुढे ७ जुलै ते १० जुलै अशी तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली.आज आषाढीच्या दिवशी दुसरी पोलीस कोठडी संपल्यानंतर अक्षय रावतला पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली.न्या. एस .एल.सोयंके यांनी अक्षय रावतची पोलीस कोठडी एक दिवसासाठी वाढवून देण्यात आली आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/07/07/अक्षय-रावतची-पोलीस-कोठडी/