नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी एका संशयीत युवकाची विचारपूस केल्यानंतर त्याने चोरी केलेल्या सात सायकली जप्त केल्या आहेत. या सायकलींची किंमत 43 हजार 500 रुपये आहे.
कालच विमानतळ पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 6 दुचाकी गाड्या जप्त केल्या होत्या.शिवाजीनगर पोलीसांना एक युवक नवीन सायकलवर फिरतांना दिसला. त्याबद्दल त्यांना संशय आला असता त्यांनी याची विचारणा केली. त्या युवकाकडे असलेली सायकल चोरीची असल्याचे सांगितले. सोबतच त्याने इतर सहा सायकली ज्या चोरल्या होत्या. ज्या काढून दिल्या. या सर्व सायकलींची किंमत 43 हजार 500 रुपये आहे. या चोरट्याचे नाव चतुर दिलीप ढेंबरे (21) रा.नागसेननगर असे आहे. पोलीसांनी त्यास अटक केली आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक नितीन काशीकर यांनी शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार देवसिंह सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे, दिलीप राठोड. रवि बामणे यांचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी एका सायकल चोराकडून 7 चोरीच्या सायकली जप्त केल्या