स्वस्त धान्य तांदुळ भरलेले दोन ट्रक अर्धापूर पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी तेलंगणा राज्यातून भरून आलेले स्वस्त धान्याच्या तांदळाचे दोन ट्रक पकडले आहेत. दोन ट्रकसह तांदळाची किंमत 37 लाख 50 हजार रुपये आहे. हे ट्रक गुजरातकडे जाणार होते.
अर्धापूर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास सत्यगणपती मंदिराच्या कमानीजवळ चौधरी धाब्यासमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक जी.जे.25 यु.व्ही.8097 आणि ट्रक क्रमंाक जी.जे.36 व्ही.2979 ची तपासणी केली असता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शासकीय तांदुळ परवाना नसतांना त्या गाडीत भरलेले होते असे दिसले. पोलीसांनी दोन ट्रकचे चालक हिरामनभाई रामभाई सिंगल (27), भरत चन्नभाई वडेदरा (32)रा.पोरबंदर गुजरात या दोघांसह तांदळाचे मालक भास्कर गोपाळ नोने रा.सरस्वतीनगर हैद्राबाद आणि मोहम्मद पाशा मोहम्मद ईस्माईल साब रा.मेढक जहिराबाद या चार जणांना गुन्हा क्रमांक 202/2022 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 मध्ये आरोपी केले आहे. या घटनेची तक्रार अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक कपील मुरलीधर आगलावे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *