नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
पोलीस अधिक्षक कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. 17 सप्टेंबर हा…
अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे नॉट रिचेबल
नांदेड(प्रतिनिधी)- आजारी असलेले भोकरचे अपर पोलीस अधिक्षक आज 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात हजर नव्हते. तेंव्हा याबाबत माहिती…
रेल्वेचा एक इंजिनिअर पोलीस कोठडीत; एक पळून गेला?
नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागातील वरिष्ठ अभियंता नांदेड याने 5 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्यानंतर विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी त्यास पोलीस कोठडीत…