नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सुरू असलेल्या पावसाची परिस्थिती आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या अतिवृष्टीला लक्षात घेवून दि.14 जुलै रोजी जिल्ह्यात इयत्ता 1 ली ते 12 वी या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व पुराची संभावना या दृष्टीने दिलेला इशारा लक्षात घेवून जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संयुक्त स्वाक्षरी करून जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्र जारी केले आहे. यानुसार पावसाच्या परिस्थितीला लक्षात ठेवून दि.13 जुलै रोजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा इयत्ता 1 ली ते 12 वी वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

आज 13 जुलै रोजी सुद्धा पाऊस काही थांबत नाही आहे.परिस्थिती बिकटच आहे त्यामुळे त्यामुळे आज शिक्षण विभागाने दिनांक 14 जुलै 2022 रोजी सुद्धा सर्व शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.