नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पावसाने अद्याप दम घेतलेलाच नाही गत 24 तासात 118 मि.मी.पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अनेक गावांना जाण्याचे रस्ते बंद झाले आहेत. अनेक जागी वाहने अडकली, लोकांना भरपूर त्रास होत आहे. तरी पण पावसाने आपला हाहाकार सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यात एकूण 510.30 मि.मी.पाऊस झाला आहे.
पावसाने सुरू केलेली रिपरिप कधी वाढत तर कधी कमी होत आहे. या परिस्थितीत सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर झाला आहे. काल दिवसभर बाजारात एक माणुस दिसला नाही. दिवसभर दुकानदार आपले दुकान उघडून बसले होेते. पण एकही खरेदी करणारा माणुस आला नाही. जिल्ह्यात अनेक गावांचे रस्त ेपाण्याने वेढले आहेत. त्यामुळे बरीच गावे संपर्काबाहेर आहेत. अनेक जागी वाहनांना अडचणी झाल्या. पाण्यामुळे खड्डे भरल्याने दुचाकी चालकांची मोठी समस्या झाली. अजूनही वेध शाळेने नांदेड जिल्ह्यासह लातूर आणि इतर ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्रासाला नेहमीच दृढपणे भिडण्याची शक्ती मानवात असल्याने पावसाच्या हाहाकारात सुध्दा जीवन सुरु आहे.
जिल्ह्यातील विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दार उघडे आहेत त्यातून पाण्याच्या होणारा विसर्ग नदीकाठील गावांसाठी नवीन त्रासाची परिस्थिती आणू शकतो. बळेगाव बंधाऱ्यातूनपण 15 गेट उघडे आहेत आणि 8 हजार 146 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या प्रकल्पानंतरच्या गावकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. प्रशासन, एनडीआरएफ, पोलीस जनतेच्या सेवेसाठी तत्परच आहेत पण जनतेने आपसात एक दुसऱ्याची मदत करण्याची भावना ठेवायला हवी. तरच पावसाच्या या तांडवाला समर्थपणे उत्तर देता येईल.
जिल्ह्यात बुधवार 13 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 124.90 (528.30) बिलोली-127.90 (513.80), मुखेड- 79.30 (480.30), कंधार-98.60 (547.20), लोहा-121.80 (505.90), हदगाव-164.50 (459.40), भोकर- 167.30 (552.10), देगलूर-58.20 (454.70), किनवट-100.30 (503.40), मुदखेड- 152.40 (639.50), हिमायतनगर-183.10 (668.20), माहूर- 86.40 (420.10), धर्माबाद-109.50 (510.80), उमरी- 151.30 (593.00), अर्धापूर- 115.80 (490.), नायगाव- 136.20 (451.70) मिलीमीटर आहे.
