नांदेड,(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेला २०१६ मध्ये झालेल्या चोरी प्रकरणात सामील असलेला एक गुन्हेगार पकडण्यात यश आले आहे.अद्याप त्यातील काही आरोपी पकडणे शिल्लक आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार देगलूर पोलीस ठाण्यात सन २०१६ मध्ये दोन चोरी प्रकरणाची नोंद आहे.त्या चोरट्यांमधील एक एकनाथ दादाराव चव्हाण (२५) रा.जांभळी तांडा ता.मुखेड जि.नांदेड हा मुखेड येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.तेव्हा चिखलीकरांनी आपले सहकारी पोलीस उप निरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव, भारत केंद्रे, संजीव जिंकलवाड,विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण,रवी बाबर, शंकर केंद्रे यांना तिकडे पाठवले. पोलीस पथकाने एकनाथ चव्हाणला पकडून आणले. त्याने सांगितले की सन २०१६ साली देगलूर मध्ये त्याने अनिल शंकर चव्हाण,भास्कर दादाराव चव्हाण,रामदास रामकिशन भोसले,श्रीकांत सर्जेराव चव्हाण यांनी मिळून त्या चोऱ्या केलेल्या आहेत.त्यातील अनिल शंकर चव्हाण,भास्कर दादाराव चव्हाण या दोघांना पोलिसांनी पकडेल आहे.पण रामदास रामकिशन भोसले,श्रीकांत सर्जेराव चव्हाण हे अद्याप फरार आहेत.पकडलेला चोर एकनाथ चव्हाण देगलूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी ६ वर्षांपूर्वी चोरी केलेल्या गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.