नांदेड(प्रतिनिधी)-दि.20 जुलै रोजी होणाऱ्या पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा सध्याच्या पावसाच्या परिस्थितीला अनुसरुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परिक्षा आता 13 जुलै रोजी घेण्यात येतील असे पत्रक महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीसाठी पाठविले आहे.
उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इयत्ता 5 वी) आणि पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इयत्ता 8 वी) या 20 जुलै 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या. त्या संदर्भाचे प्रवेश पत्र जारी पण करण्यात आले होते. सध्या राज्यभर असलेली पावसाची उग्र परिस्थिती पाहता या दोन्ही परिक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परिक्षा आता 31 जुलै 2022 रोजी एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. या परिक्षांसाठी जारी झालेले परिक्षा प्रवेश पत्र 31 जुलै रोजी होणाऱ्या परिक्षेसाठी ग्राहय धरले जाईल असे या प्रसिध्दीपत्रकात लिहिले आहे.
इयत्ता 5 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षा आता 31 जुलै रोजी होणार