नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेचा आंघोळ करतांनाचा व्हिडीओ घेवून तो इतरांना व्हॉटसऍप संकेतस्थळावरुन पाठविणाऱ्या एका 32 वर्षीय व्यक्तीला विमानतळ पोलीसांनी अटक केल्यानंतर पाच दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात झाली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या जावेद खान महेमुदखान पठाण (32) याची ओळख होती. तिच्याकडे मोबाईल नव्हता. गरजेला जावेद खानचा मोबाईल घेवून ति आपले काही काम करत होती. एकेदिवशी दुपारी मी आंघोळ करत असतांना जावेद खान पठाणने मी आंघोळ करतांनाचा व्हिडीओ काढला. तसेच एके दिवशी माझ्या घरी कोणीच नाही हे पाहुन तुझा फोन आला आहे असे सांगून मला आपल्या घरी बोलावले आणि मी अंघोळ करतांना काढलेला व्हिडीओ मला दाखवला. माझा व्हिडीओ पाहुन मी थक झाले अजून कांही माझे चित्र आहेत काय अशी विचारणा केली आणि ते सर्व डिलिट करायला सांगून मी निघून गेले. आपल्या घरी सांगितले तर आपल्या घरची मंडळी आपल्यालाच रागवेल म्हणून मी ही घटना कोणालाच सांगितली नाही.
दि.5 जुलै रोजी मी जावेद खान पठाणचा फोन घेवून ज्यांना फोन लावयची ते माझे नातलग नांदेडला आले आणि मला जावेद खानच्या फोनवर कॉल करून मला दुसरीकडे भेटायला बोलावले. त्यावेळी मी माझ्या मैत्रीणीसह गेले तेंव्हा त्यांनी मला मोबाईल क्रमांक 7666896054 वरुन आलेला माझाच व्हिडीओ मला दाखवला. त्यानंतर मात्र मी घडलेला प्रकार माझ्या घरी सांगितला आणि तक्रार देत आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 353(क), 34 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम कलम 12 आणि 13 (अ)(क) तसेच तंत्रज्ञान कायदा कलम 67(ब) प्रमाणे गुन्हा क्रमांक 236 /2022 दाखल केला.
विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांनी जावेद खान महेमुद खान पठाणला 9 जुलै रोजी अटक केली. 9 ते 14 जुलै अशी न्यायालयाने जावेद खान पठाणला पोलीस कोठडी मंजुर केली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीसांनी न्यायालयाला विनंती करून त्याची रवागनी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालयाने त्यास सध्या तुरूंगात पाठवून दिले आहे.
16 वर्षीय बालिकेचा आंघोळ करतांनाचा व्हिडीओ काढून व्हायरल करणारा तुरूंगात