नांदेड (प्रतिनिधी)-सलग दुसऱ्या दिवशी सुर्याचे दर्शन झाल्याने आज नागरीकांना आनंदच झाला. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 7.80 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत आजपर्यंतचा पाऊस 588.20 मिलीमिटर झाला आहे.
जिल्ह्यातील आणि लगतच्या पाणी प्रकल्पाची परिस्थिती पुढील प्रमाणे आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात आता उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी 685.74 दलघमी झाली आहे. या प्रकल्पात पाण्याची आवक 4.11 दलघमी सुरू आहे.
बळेगाव बंधाऱ्यात पाण्याची पातळी 338.20 मीटर झाली आहे. या प्रकल्पातून 895.57 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाचे 7 दरवाजे उघडे आहेत. या धरणातील पाणी साठा 31.45 टक्के झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 15 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.20 (576.70), बिलोली-21 (623.40), मुखेड- 3.70 (529.30), कंधार-2.70 (594.40), लोहा-1.60 (550.90), हदगाव-3.70 (537.70), भोकर- 3.80 (664.90), देगलूर-5.70 (499.50), किनवट-12.40 (605.80), मुदखेड- 2.90 (749.50), हिमायतनगर-4.60 (784.80), माहूर- 13.30 (495.90), धर्माबाद- 24.70 (615.80), उमरी- 21.50 (722.40), अर्धापूर- 6.20 (574.70), नायगाव- 7.10 (542.50) मिलीमीटर आहे.
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.80 मि.मी. पाऊस