नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात समोरुन आरसा मागून बुरसा; स्वच्छतेचा बोजवारा

नांदेड(प्रतिनिधी)-यत्र तत्र सर्वत्र मेहनत घेवून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे तोंडी आदेशाचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब पुन्हा आपल्या खुर्चीवर आसीन तर झाले. पोलीस ठाण्याचे कांही कक्ष अत्यंत सुंदर, साफ सुथरे ठेवले पण पोलीस ठाणे अंमलदार बसतात त्या मागे कधी पाहिलेच नाही. अत्यंत घाण अवस्थेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आज कार्यरत आहे. आता पाऊस पडणे थांबणे आहे. त्यामुळे या घाणीमध्ये तयार झालेली रोगराई नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीसांना सुध्दा बाधीत करेल याच्याकडे सुध्दा सन्माननिय अशोकरावजी घोरबांड साहेबांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अख्यायीका आहे की, अरसदारी औदुंबर आणि परसदारी पिंपळ अशी अवस्था आपल्या प्रतिष्ठाणांची असावी जी त्यात उन्नती करते असे सांगितले जाते. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे खुप मोठ्या भुखंडावर वसाहलेले आहे. सन 2007 साली नवीन इमारत पोलीस ठाण्याला प्राप्त झाली आहे. सध्या तर त्यात अत्यंत विचारवंत, समाजासाठी झटण्याची तयारी असणारे, लोकशाहीतील सर्वात शेवटच्या माणसासाठी पोलीस नोकरीत आलेले सन्माननिय श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत. मागील दीड वर्षापासून जास्त कालखंड झाला आहे. तरी पण त्यांच्या नियुक्तीचे आदेश नाही त्यांना तोंडी नियुक्ती आहे. दरम्यानच्या काळात त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण त्या जिल्ह्याच्या जबाबदारी ऐवजी त्यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचीच जबाबदारी त्यांना जास्त छान वाटत होती. म्हणून जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्यानंतर यत्र तत्र सर्वत्र मोठी मेहनत घेवून त्यांनी पुन्हा आपले स्थान प्राप्त केले.
छान झाले त्यांच्या मनासारखे घडले. त्यांना हवी तीच खुर्ची परत प्राप्त झाली. मिळाली कशी ते आम्ही लिहिणार नाही. पण आलेल्या जबाबदारीला पार पाडत असतांना जबाबदारी मनानेच पाळायला हवी. कारण एक विचरवंत सांगतो कांही सुंदर विचार बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि जगाला आपणही कळत नाही. तसेच सुंदरता कपड्यात, चेहऱ्यात, नसते तर ती मनात असावी लागते. काल प्राप्त झालेले दोन छायाचित्र पाहिल्यावर आम्हाला हे लिहावे लागते. कांही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी उभे राहुन सन्माननिय श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब सुचना देत आहेत. घोरबांड साहेबांच्या समोरच काही फुटाच्या अंतरावरचे दार उघडले तर अत्यंत घाणेरडी परिस्थिती आहे. या परिस्थितीला बदलण्याची जबाबदारी सुध्दा प्रभारी अधिकारी म्हणून श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांचीच आहे. या ठिकाणी साचलेल्या घाणीवर मागील तीन दिवस पावसाने त्या घाणीला आणखीन घाण केले आहे. असे म्हणतात पाऊस बंद झाल्यानंतर जास्त दक्षता घ्यावी लागते. कारण अशा घाणीमधून रोगराई उत्पन्न होत असते. या रोेगराईपासूनचा आघात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांच होणार आहे. तेंव्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कुटूंब म्हणून आपल्या पोलीस ठाण्याचा सर्व परिसर स्वच्छ व सुंदर राहावा याची जबाबदारी सुध्दा सन्मानिय श्री. अशोकरावजी घोरबांड साहेबांवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *