नांदेड(प्रतिनिधी)-एक अल्पवयीन बालिका शोधुन पुन्हा तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करून पोलीसांनी पोलीसींग पेक्षा वेगळे काम करत एक आदर्श तयार केला.
पोलीस ठाणे विमानतळ येथे एक 15 वर्षीय बालिका कोणी तरी अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी पळविल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 352/2021 भारतीय दंड संहिततेच्या कलम 363 नुसार दाखल झाला होता. ही मुलगी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाने शोधली. माहिती घेतली असता या बालिकेला आई-वडील शिक्षण घेवू देत नाहीत म्हणून ती कोणास काही न सांगता घर सोडून निघून गेली होती. पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, मारोती माने, शितल सोळंके यांनी ही अल्पवयीन 15 वर्षीय बालिका शोधली. तिच्या आई-वडीलांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी विमानतळचे पोलीस उपनिरिक्षक रेडेकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गोविंदरावजी मुंडे , अत्यंत जबरदस्त पोलीस अंमलदार संजय केंद्रे , संजीव जिंकलवाड, गजानन बैनवाड यांच्या उपस्थितीत ही अल्पवयीन बालिका पोलीस पथकाने बालकल्याण समितीच्या आदेशानुसार पालकांच्या ताब्यात दिली आहे.
पोलीसांनी अल्पवयीन बालिका शोधून आई-वडीलांच्या स्वाधीन केली