नांदेड,(प्रतिनिधी)- हिंगोली नाका ते तरोडा नाका प्रवासा दरम्यान एका तृतीयपंथियांचा मोबाईल ऑटो रिक्षात विसरल्यानंतर ऑटो चालकाने तो मोबाईल वाहतूक पोलिसांच्या साक्षीने परत केला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका प्रवासादरम्यान तृतीयपंथीचा मोबाईल फोन ऑटोरिक्षा क्रमांकMH 26 BD 0960 मध्ये विसरून राहिला होता. या ऑटो रिक्षाचे चालक टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड चे सदस्यदेवसिग भुजंग सिंह देवबन्सी हे होते. विसरलेला मोबाईल फोन देवसिंह यांनी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी बाभळीकर यांच्या समक्ष तृतीयपंथाला परत केला.तृतीय पंथीयांनी रिक्षा चालक देवबन्सी व ऑटो रिक्षा संघटनेचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.