नांदेड(प्रतिनिधी)-लग्न झालेल्या एका विवाहितेला तुझ्यासोबतच जगायचे आहे अशी हुल देवून तिच्यावर अत्याचार केल्याप्ररकणी इतवार पोलीसांनी एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला. आज दि.17 जुलै रोजी प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी या युवकाला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या घरा शेजारी राहणारा युवक निहाल अशोक कांबळे यांची ओळख झाली. ओळख प्रेम संबंधात बदलली. त्यानंतर युवतीच्या आई-वडीलांनी निहाल कांबळेच्या कुटूंबियांना लग्न करण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर या युवतीचे लग्न दुसऱ्या राज्यातील एका युवकासोबत झाले. तरी निहाल कांबळे तिला फोन करून नेहमी त्रास देत असे. या युवतीला एकादा मरण पावलेले बाळ जन्मले त्यानंतर ती 3 फेबु्रवारी 2021 रोजी आपल्या आई-वडीलांकडे आली. त्यानंतर पुन्हा निहाल कांबळे आपण सोबत राहु, लग्न करू, तुझ्या नवऱ्याला फारकत दे असे सांगून तिची नेहमी दिशाभुल करत असत. या दरम्यान या युवतीच्या घरी कोणी नसतांना निहाल कांबळे या बाबीचा फायदा नेहमीच घेत होता. युवतीकडून निहालच्या सांगितल्यानंतर नवऱ्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
दि.14 जुलै रोजी निहाल तिला सकाळी 10 वाजता पुण्याला जायचे आहे म्हणून घरून घेवून गेला. रेल्वे स्थानक, बसस्थानक येथे जावून आता गाड्या नाहीत म्हणून परत एका पत्राच्या शेडमध्ये ठेवले आणि रात्रभर तिच्यावर अत्याचार केला. 15 जुलै रोजी सकाळी 5 वाजता पुण्याला जाण्यासाठी कागदपत्र लागतील असे सांगून तो निघून गेला. तो परत आला नाही तेंव्हा युवती आपल्या घरी गेली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मी तक्रार देत आहे असे या तक्रारीत लिहिले आहे.
या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 181/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(एन) प्रमाणे निहाल अशोक कांबळे विरुध्द दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. रुपाली कांबळे यांनी निहाल अशोक कांबळेला अटक केली. आज दि.16 जुलै रोजी निहाल अशोक कांबळेला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील ऍड. विजय तोटवाड यांनी या गुन्ह्याच्या सविस्तर तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याबद्दलचे सादरीकरण न्यायालयात केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश पी.एस.जाधव यांनी निहाल अशोक कांबळेला तीन दिवस अर्थात 19 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून विवाहित युवतीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी