नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी 52 पत्याच्या गुलामावर धाड टाकली. पाच जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 12 हजार 900 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे आपल्या फौजफाट्यासह 16 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजता महालक्ष्मी रेस्टॉरंटच्या शेजारी, परमार वॉटर सप्लायर्सच्या समोरच्या मोकळ्या जागेत पोहचले. तेथे काही जण 52 पत्यांचा जुगार डाव खेळत होते. त्यावेळी पोलीसांनी मिर्झा रेहमान बेग (32) रा.देगलूर नाका, अमेर सय्यद चाऊस (32) रा.देगलूर नाका, शेख अस्लम शेख बाबू (30) रा.हिंगोली नाका, इम्तीयाज अहेमद खान एजाज अहेमद खान (30) रा.फारुखनगर नांदेड, तय्यबबीन हुसेन चाऊस (27) रा.दर्वेशनगर यांना पकडले. हे सर्व 52 पत्यांच्या जोरावर गुलामासोबत खेळत होते. त्यांच्याकडून 12 हजार 900 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची तक्रार पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांनी दिली. त्यानुसार विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 245/2022 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार लोखंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
52 पत्याच्या डावावर विमानतळ पोलीसांनी टाकली धाड