नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद्मजा सिटी या उच्चभू्र सोसायटीमध्ये एका घरातून चोरट्यांनी एलईडी आणि डीव्हीआर असा 15 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
अनिल रामराव इटापल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 जुलैच्या रात्री 9 ते 16 जुलैच्या रात्री 9 या वेळेदरम्यान पद्मजा सिटी येथे त्यांचे बंधू सुरेश इटापल्ले यांच्या घरातून 10 हजार रुपये किंमतीचा एक एलईडी आणि 5 हजार रुपयांचा एक डीव्हीआर असा 15 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते अधिक तपास करीत आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसना ते शिवमंदिर रस्त्यावर एम.एच.26 बी.झेड 3314 ही 67 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 13 जुलैच्या रात्री 12 ते सकाळी 10.30 वाजेपर्यंत चोरीला गेली आहे. याबाबत मजुरी व्यवसाय असलेले आकाश अभंगराव शिंदे यांनी दिली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी