उद्या पीडितांशी सवांद साधण्यासाठी तज्ञांची बैठक
नांदेड(प्रतिनिधी)- भीमा कोरेगाव प्रकरणातील पिडीतां विरोधात सरकारच्या दबावाने एकतर्फी निर्णय लागण्याची प्रक्रिया सध्या महाराष्ट्रात सुरू असून राज्य शासनाच्या या तंत्रा विरोधात न्यायालय लढा उभा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर तथा प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तज्ञ वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. न्यायालयात ही तज्ञ वकलांची फळी या प्रकरणातील निर्दोष लोकांसाठी मोठ्या ताकदिने लढणार आहे. याचाच भाग म्हणून उद्या दिनांक 19 जुलै 2022 रोजी नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीने नेमलेल्या तज्ञांच्या टीम सोबत नांदेड जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणातील सर्वच पीडितांशी रीतसर संवाद साधून न्यायालयात लढा उभा करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीने नियुक्त केलेले ॲड.योगेश विठ्ठल मोरे हे वकिल आघाडीचे राज्य समन्वयक मार्गदर्शन करणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या- त्या भागातील या प्रकरणातील पीडित समाज बांधवांना घेऊन या बैठकीला उपस्थित राहायचे राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, उपाध्यक्ष गोविंद दळवी , डॉ. संघरत्न कुऱ्हे, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, जिल्हाध्यक्ष निरंजनाताई आवटे, दैवशाला ताई पांचाळ जिल्हा महासचिव शामभाऊ कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, आयुब खान पठाण, आदींनी केले आहे. सदरील बैठक उद्या दुपारी ठीक 1:00 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न होणार असून या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाभरातील पीडित कार्यकर्त्यांसोबत या बैठकीला हजर राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.