नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी च्या वतीने साहीत्यसम्राठ अण्णा भाऊ साठे यांचा स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन हे अण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाक्रतीपुतळा परिसरात छोटे खानी कार्यक्रमात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आध्यक्ष म्हणून आम आदमी पार्टी चे जेष्ठ नेते नरेंद्र सिंघ ग्रंथी. नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभाप्रमुख. अडव्होकेट जगजीवन भेदे. डॉ. अँड. रितश पाडमुख डॉ. शुभम महाजन,सोम ईंचा भारती हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वच मान्यवर यांच्या हास्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पुर्णाक्रतीपुतळा पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. यावेळी आम आदमी पार्टी चे नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा प्रमुख अँड जगजीवन भेदे म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केवळ समाज जाग्रतीसाठी प्रबोधनासाठी शाहीरीच केली नाही तर त्यांनी समाजातील, तळागळातील लोकापर्यतचे वास्तव त्यांच्या लेखणीतुन साकारले.त्यांनी ग्रामीण साहीत्याची ओळख विश्वासमोर करुन दिली.म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे समाजातील दुर्बल घटकासाठी क्रांतीरुपी जगण्याचे बळ देते असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास आम आदमी पार्टी चे अँड.प्रकाश सुर्यवंशी, सेवानिवृत्त पोलीस उप निरिक्षक श्री. डी.के.डोम्पले, बा.रा.वाघमारे,नामदेव काळे,बालाजी ननावरे,सौ.अरुणा बाभळे,श्रीकांत डहाळे.कपिल जोंधळे, मोहण पवार,विनोद हाडसे यांच्या सह असंख्य कार्यक्रते उपस्थित होते.