नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे रखडलेल्या कामाची विचारणा करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे यांच्यावर कार्यवाही करण्याचे निवेदन सार्वजिनक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे महामार्ग क्रमांक 260, कंदकुर्ती ते धर्माबाद येथील शंकरगंज भागात रखडलेल्या नाले बांधकामामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. याबद्दलचा जाब विचारण्यासाठी धर्माबाद येथील शिवसैनिक अभियंता हनुमंत नरवाडे यांच्याकडे गेले असतांना नरवाडे यांनी शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरे आणि शहरप्रमुख अनिल कमलाकर यांच्यासह इतर शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले. हे खोटे गुन्हे दाखल करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोरे यांनी भाग पाडले आहे. कोरे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पांढरे यांच्याकडे केली आहे.
सा.बां.विभागाचे कोरेवर कार्यवाही करा-प्रकाश मारावार