डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आवेदनपत्रातील त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी)-  अनु.जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंअतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या वर्षात आवेदनपत्र सादर केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात त्रुटी आहेत. त्यांच्या आवेदनपत्रातील त्रुटीची पूर्तता करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे. विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रातील त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. पात्र असलेल्या आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी  केले आहे.

या योजनेअंतर्गत समाज कल्याण कार्यालयामार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे काही प्रश्न अथवा शंका असल्यास अथवा या योजनेसंबधी माहिती हवी असल्यास थेट सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा. याबाबत कोणत्याही अनभिज्ञ व्यक्तीशी संपर्क साधू नये अथवा कोणत्याही अमिषास बळी पडू नये. अनधिकृत व्यक्तीशी संपर्क केल्यास होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी. संबधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाज कल्याण कार्यालयातील संबंधीत कार्यासनाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *