भाग्यनगर हद्दीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्याचा व्हिडीओ व्हायरल
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर उपविभागाच्या पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत कॅनॉल रोडवर एक मोठा मटक्याचा अड्डा सुरू असल्याचा एक व्हिडीओ व्हॉटसऍप संकेतस्थळावर व्हायरल झाला आहे. सर्वकांही बंद आहे असे सांगणारे पोलीस विभाग आता तरी काही कार्यवाही करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नांदेड पोलीस दलाच्यावतीने सध्या सर्व काही बंद आहे असे सांगितले जाते. पण सर्व कांही सुरूच आहे असे दिसते. नांदेडच्या पश्चिम दिशेला कॅनॉल रोड आहे. या रोडवर एक चांगलाच मोठा स्वरुपाचा मटक्याचा जुगार अड्डा सुरू असल्याचे चित्रीकरण कोणी तरी केले आणि ते व्हिडीओ चित्रीकरण अनेक संकेतस्थळांवर व्हायरल सुध्दा केले.
सामाजिक विचार केला तर मटक्याचे अड्डे, 52 पत्यांच्या जुगाराचे अड्डे सुरू असायला हवेत कारण त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. अनेक जण त्या जोरावर श्रीमंत झाले.कलापर्यंत छोटीशी दुचाकी नव्हती ती मंडळी आता वातानुकुलीत गाड्यांमध्ये फिरायला लागली आहे. जुगार अड्ड्यासाठी तर वातानुकुलीत गाड्यामध्ये बसून घेवून जाण्याची तयार अनेक अड्डा चालकांची आहे. पण जुगाऱ्यांनाच कळत नाही की, शेवटी आम्हीच हारणार आहोत. कांही जण तर जुगार अड्ड्यांवर हात चालाखी करून सुध्दा रक्कमा जिंकणातात. सुदैवाने ते कधी पकडले गेले नाहीत. पकडले गेले तर काय होईल.
मटक्याच्या अड्ड्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ आजच्या परिस्थितीत मटक्याचा जुगार अड्डा हा राजरोसपणे सुरू असल्याचे दाखवतो. तेथे बसलेली मंडळी आणि तेथून येवून मटक्यांच्या आकड्यावर पैसे लावणारी मंडळी अत्यंत सुरक्षीत आहे असे त्या व्हिडीओमधून दिसते. पण महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जुगार कायदा तयार केलेला आहे ना म्हणून कायदेशीररित्या असे मटक्यांचे अड्डे आणि 52 पत्यांच्या जुगाराचे अड्डे चालू न देणे ही जबाबदारी पोलीस विभागावर आहे. पोलीस विभाग आता तरी काही कार्यवाही करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नांदेड शहर उपविभागात हा जुगार अड्डा सुरू आहे. या शहर उपविभागाचे प्रमुख अत्यंत बारकाईने कायदा पाहणारे पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेन देशमुख हे आहेत. व्हायरल झालेला व्हिडीओ बातमीसोबत वाचकांच्या अवलोकनासाठी जोडला आहे.
नांदेड शहर पोलीस उपविभागात मटक्याचे अड्डे जोरात सुरू