
नांदेड,(प्रतिनिधी)- शंकरनगरी,भगतसिंघ चौक,कौठा या भागात साचलेल्या पाण्याने नागरिकांनाचे बेहाल केले आहेत.कुठे गेली स्वच्छ नांदेड सुंदर नांदेडची घोषणा अशी विचारणा नागरिक करत आहेत.
महानगर पालिका नांदेडच्या हद्दीतील शंकरनगरी , भगतसिंघ चौक,कौठा याभागात अनेक पोलीस,वकील सरकारी अधिकारी कर्मचारी यांची घरे आहेत.या भागात पावसाच्या पाण्याने असंख्य ठिकाणी डबके साचले आहेत.या भागात राहणारे अनेक लोक जनतेच्या सेवेसाठी आपली घरे आणि कुटुंब सोडून जातात पण त्यांच्या घरांची सुरक्षा कोणी करावी हा प्रश्न नेहमीच असतो.आता सध्या निसर्गाने आपली अवकृपा सुरु ठेवली. त्यामुळे या भागातील नागरिकांना घरात राहून तुरुंगात कोंडल्या सारखे झाले आहे. महानगरपालिका सर्व सामान्य नागरिकांना भौतिक सुविधा पुरवण्यासाठी जबाबदार असतांना मात्र या भागात साचलेल्या पाण्याने रोगराई पसरून जनतेला धोका तयार झाला आहे.या भागात राहणारी मंडळी अर्थात नागरिक महानगरपालिकेचे कर सुद्धा भंते आहे.तेव्हा स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड हि घोषणा कोठे गेली असा प्रश्न या भागातील नागरिक विचारत आहे.
