नांदेड(प्रतिनिधी)-दयानंदनगर येथील रहिवाशी तथा जिल्हा कृषी विभागातील निवृत्त कर्मचारी कनकय्या हनमय्या गडप्पा (वय 79) यांचे बुधवारी (ता.२०) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता.२१) गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात दोन मुली, दोन मुले, नातू, पणतू असा परिवार आहे. छायाचित्रकार नरेंद्र गडप्पा यांचे ते वडील होत.