प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची दमदार कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या अत्यंत कार्यक्षम आणि कुशल नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक यांनी घेतलेल्या अत्यंत कठोर मेहनतीनंतर सन 2021 मध्ये सोयाबीन चोरी झालेल्या प्रकारातील 90 हजारांचे सोयाबीन एका चोरट्याला पकडून जप्त करण्याची भारी किमया स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे.
काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे आहेत. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत अत्यंत मेहनती आणि जबरदस्त कामगिरी करण्याची ख्याती असलेले पोलीस निरिक्षक द्वारकादासजी चिखलीकर यांनी एका जुन्या गुन्ह्यातील एक आरोपी पकडला आणि त्याच्याकडून सन 2021 मध्ये उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेले 90 हजार रुपयांचे सोयाबीन 2022 मध्ये जप्त केले आहे.
उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 254/2021 दाखल झाला होता. या गुन्ह्यात 30 क्विंटल सोयाबीन, जवळपास 2 लाख ते 2 लाख 50 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. तसेच ईस्लापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 104/2021 मध्ये सुध्दा सोयाबीन चोरीला गेले होते. या दोन्ही गुन्हे करण करडेवार, राजा उर्फ चिंग्या, शरद सुर्यवंशी, परमेश्र्वर गायकवाड, महेश गायकवाड, दशरथ उर्फ नामदेव देवकर, शंकर रॅपनवाड, दत्ता शिंदे या आठ जणांसह मिळून श्रीकांत खंडू सावळे (28) रा.डोरली ता.हदगाव यांनी मिळून केल्याची माहिती पकडलेला सोयाबीन चोर श्रीकांत खंडू साळवे याने सांगितली.
उमरी पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 254 या अगोदर 9 जणांपैकी करण करणेवाड आणि राजा उर्फ चिंग्या या दोघांना अटक झालेली आहे. इतर सात जण फरार होते. त्यातील श्रीकांत खंडू साळवेला स्थानिक गुन्हा शाखेने 90 हजारांच्या सोयाबीनसह पकडले आहे.
प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, हजेरी मेजर सखाराम नवघरे, बालाजी तेलंग, अत्यंत दमदार पोलीस अंमलदार अफजल पठाण, संजीव जिंकलवाड, शेख कलीम आणि हनुमान ठाकूर यांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *