नांदेड(प्रतिनिधी)-प्रभारी पोलीस अधिक्षकांच्या अभिरक्षेत नांदेड जिल्हा असतांना चोरट्यांनी वजिराबाद भागात एका लाईनने चार दुकाने फोडली आहेत. प्राप्त माहितीनुसार वृत्तलिहिपर्यंत याबद्दलची कोणतीही तक्रार आली नव्हती आणि दुकानातून कांही मोठा ऐवज चोरीला गेला नाही.
नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे हे कालपासून काही दिवस सुट्टीवर गेले आहेत. सध्या प्रभारी पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्याकडे आहे. पोलीस अधिक्षक सुट्टीवर गेले त्याच रात्री नांदेड शहराचे हृदय, पोलीस अधिक्षक कार्यालयापासून जवळच असलेल्या वजिराबाद भागातील देशपांडे व्यापारी संकुलातील लाईनीने असलेल्या एक , दोन, तीन आणि चार या दुकानांचे शटर चोरट्यांनी तोडले ही घटना सकाळी लक्षात आली.
या दुकानांमधून कांही मोठा ऐवज चोरीला गेला नाही अशी माहिती सांगण्यात आली. वृत्तलिहिपर्यंत वजिराबाद पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रारही आली नव्हती. पण वजिराबाद भागात दुकाने फोडली गेली आणि ती सुध्दा चार ही बाब महत्वपूर्ण आहे. देशपांडे व्यापारी संकुलातून दक्षीण-उत्तर असा पुर्ण रस्ता आहे. उत्तर दिशेकडे असलेल्या गल्लीतून चोरटे आले असतील असा अंदाज व्यक्त होत आहे. तक्रार आली नसली तरी पोलीस याबाबत शोध घेत आहेत.
वजिराबाद भागातील चार दुकाने फोडली