नांदेड(प्रतिनिधी)- निवघा बाजार ता.हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 46 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
शिवाजी कचरु चौरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गणपतीनगर निवघा बाजार येथील त्यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी 22 जुलै रोजीच्या मध्यरात्री 1.30 वाजता फोडले. त्यांच्या घराच्या मागील दाराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि खोलीतील लोखंडी अलमारी तोडून त्यातून 1 लाख 46 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक चोपडे अधिक तपास करीत आहेत.