नांदेड (प्रतिनिधी)-प्रेम प्रकरणानंतर मुलीच्या भावाने आणि वडीलांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून प्रेमीने आत्महत्या केल्यानंतर दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.20 जुलैच्या रात्री 9 ते 21 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान मौजे बामणी (बु) ता.बिलोली येथे गोविंद पिराजी बादेवाड (30) या युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गोविंदची आई देऊबाई पिराजी बादेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गळफास घेवून आत्महत्या केलेला त्यांचा मुलगा गोविंद बादेवाडचे प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्या युवतीचा वडील सुभाष गुजेवाड आणि भाऊ शंकर गुजेवाड दोघे रा.बामणी (बु) ता.बिलोली यांनी गोविंद बादेवाडला असा त्रास दिला की, त्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बिलोली पोलीसांनी गुन्हा क्रमांक 174/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सावित्रा रायपल्ले यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रेमप्रकरणातून युवकाची आत्महत्या; प्रेमीकेचे वडील आणि बंधू विरुध्द गुन्हा दाखल