नांदेड(प्रतिनिधी)-एका फोटोग्राफरच्या बंधूचा खून करून त्याला वाहत्या पाण्यात फेकून दिल्याचा प्रकार मारलेगाव, बोरगाव शिवारात उघडकीस आल्यानंतर तीन जणांविरुध्द हदगाव पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा मुरलीधर कदम या फोटोग्राफी करणाऱ्या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार 21 जुलै रोजी त्याचा लहान भाऊ सचिन मुरलीधर कदम हा गायीला वळू लावण्याकरीता शिवाजी विठ्ठल सूर्यवंशी रा.मारेलेगाव याच्यासोबत गेला होता. त्यावेळी सचिन मुरलीधर कदम (23) च्या मोबाईलमध्ये शिवाजी विठ्ठल सूर्यवंशीने पाहिले की, त्याचे कोणत्या तरी महिलेशी अनैतिक व्हिडीओ असल्याचा व्हिडीओ आहे. या कारणासाठी सचिनला एकटे पाहुन इतर दोघे अशा तिघांनी मिळून धारधार शस्त्रांनी त्याला जखमी करून ठार केले आणि नाल्याच्या पाण्यात फेकून दिले.
हदगाव पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 219/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बाळू चोपडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
फोटोग्राफर बंधूचा खून