
नांदेड(प्रतिनिधी)-हिंदुंच्या हत्या आणि प्रसंगी दिल्या जाणाऱ्या धमक्या या पार्श्र्वभूमीवर आज अनेक हिंदु संघटनांनी एकत्रीतपणे मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
देशभरात हिंदु समाज दहशतीच्या सावटाखाली आहे, लव्ह जिहाद, लॅंड जिहाद असे अनेक जिहाद हिंदु समाजावर आक्रमण करत आहेत. जोधपुरमध्ये झालेली कन्हैयालालची झालेली हत्या, अमरावतीत झालेली उमेश कोल्हे यांची हत्या हे त्यातील उदाहरण आहेत. कर्नाटकमध्ये झालेल्या हिंदु मुलींच्या हत्या, देशभरात रामजन्मोत्सव मिरवणूकांवर झालेले हल्ले हे सर्व निषेधात्मक आहेत. हरियाणामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या झाली. 2047 साली संपूर्ण भारत मुस्लीम समाज बनावायचा आहे यासाठी झालेली भाषणे ही देशासाठी घातक आहेत. मुस्लिम राष्ट्र करण्याच्या वल्गनेतुनच अनेक हिंदुच्या हत्या घडल्या त्याबद्दल निषेध करण्यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा देश संविधानानुसार चालतो की, शर्यतच्या अनुसार असा प्रश्न विश्र्व हिंदु परिषद नांदेडने दिलेल्या निवेदनात लिहिला आहे.

यासाठी आज हिंदु संघटनांनी मुक मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा भोजालाल गवळी चौक सराफा येथून सुरू झाला त्याची समाप्ती जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या मुक मोर्चामध्ये समाजातील अनेक नागरीकांनी, महिलांनी सहभाग घेतला होता. अत्यंत शांततापूर्ण पध्दतीने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देवून त्याची सांगता झाली. पोलीस विभागाने या मोर्चाच्या वेळेत योग्य बंदोबस्त ठेवला होता.
