नांदेड (प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने खांडल विप्र शाखा सभा नांदेडबद्दल रिमोट कंट्रोलवर चालणारी शाखा सभा या आशयाचे वृत्त 23 जुलै रोजी प्रसारीत केले होते. वृत्ताचा परिणाम भरपूर झाला आणि 24 जुलै रोजी रिमोटवर चालणाऱ्या खांडल विप्र शाखा सभा नांदेडच्या अध्यक्षांनी एक नवीन व्हॉटसऍप गु्रप स्थापन करून मी रिमोटवरच चालणारा आहे हे दाखवून दिले. याबद्दल जुन्या व्हॉटसऍप गु्रपवर बऱ्याच प्रतिक्रिया येणे सुरू झाल्या आहेत.
खांडल विप्र शाखा सभा नांदेड ही एक रिमोट कंट्रोलवर चालणारी शाखा सभा आहे याबद्दल वास्तव न्युज लाईव्हने 23 जुलै रोजी वृत्त प्रकाशीत केले. या सभेचे अध्यक्ष श्रीमान प्रेमराजजी शर्मा हे आहेत. खंडेलवाल समाजातील ऍड. दिपक शर्मा यांनी सन 2015 मध्ये नांदेड खंडेलवाल समाज नावाचा व्हॉटसऍप गु्रप तयार केला आणि नांदेड शहरातील सर्व खंडेलवाल समाजातील व्यक्तींना त्यात सदस्य केले. या गु्रपचा उद्देश असा होता की, समाजातील सर्व घडामोडी एक दुसऱ्याला सहज कळाव्यात, कार्यक्रमांचे आदान-प्रदान करता यावेत आणि त्यातून समाजात समन्वय असावा. त्या गु्रपचे दुसरे गु्रप ऍडमिन द्वारकादास शर्मा हे आहेत. या गु्रपनुसार सर्व कामकाज चालत होते. समाजातील प्रत्येक व्यक्ती यात सहभागी होता. आप-आपल्या परिने सर्वांसाठी हा गु्रप एक उत्कृष्ट माध्यम होते.
हा व्हॉटसऍप ग्रुप तयार झाल्यानंतर श्री. प्रेमराजजी शर्माच अध्यक्ष होते. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सुध्दा ते स्वत:च अध्यक्ष झाले आणि ते स्वत: सुध्दा या गु्रपचे सदस्य होते. त्यांनी ज्या पध्दतीने अध्यक्षपदाचा कारभार सांभाळायला हवा त्या पध्दतीने सांभाळला नाही म्हणून बरेच जण या गु्रपमध्ये आपल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून देत होते. आपले नाते हे मनाने तयार झाले पाहिजे डोक्याने नव्हे आणि असेच या गु्रपमध्ये होत होते.म्हणूनच वास्तव न्युज लाईव्हने त्या संदर्भाचे वृत्त प्रकाशित करून गु्रपमधील सत्यता मांडली होती.ज्या-ज्या संघटनांचे अध्यक्ष देशभरात आहेत. त्यांना आपल्या विरुध्द बोलले सुध्दा ऐकावेच लागते. हा संघटनांचा सत्य भाग आहे. कोणी बोलत असेल तरी त्याला पदाधिकाऱ्याने समजून घेणे आणि त्याची नाराजी दुर करून पारदर्शकपणे संघटनेचा कारभार चालविणे ही जबाबदारी असते. आदर आणि प्रशंसा ही मागून मिळत नसते ती कमवावी लागते. तसेच डोळे फक्त दृष्टी देतात परंतू काय पाहायचे आहे हे मन ठरवत असते. माणुस आपला अभिमान आपल्या चांगल्या वेळेत दाखवतो परंतू त्याचा परिणाम त्याला वाईट दिवसांच्या वेळेसच त्याला समोर येतो असे विचारवंत सांगतात. तेंव्हा दिसणाऱ्या दृष्ट्यांना आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्यानुसार त्यातील सकारात्मकता आणि नकारात्मकता स्पष्ट होते. कांही सुंदर विचार बाहेर आल्याशिवाय जग कळत नाही. मी पणा सोडल्याशिवाय माणसे जुळत नाहीत. कोणासाठी धावू गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही असे विचारवंत सांगतात.तेंव्हा यातील आपल्यामध्ये काय आहे आणि काय कमतरता आहेत याचा शोध आणि बोध आपण स्वत:च घ्यायला हवा.
वास्तव न्युज लाईव्हने रिमोटकंट्रोलचे वृत्त प्रकाशीत केल्यानंतर नांदेड खंडेलवाल शाखा नावाचा एक नवीन गु्रप समाजाचे अध्यक्ष श्रीमान प्रेमराजजी शर्मा यांनी तयार केला. त्यात काही जणांना स्वत: ऍड केले आणि काही जणांना गु्रपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. यावरून नांदेड खंडेलवाल समाजात गट तयार झालेत हे स्पष्ट झाले. या गु्रपवर बऱ्याच जणांनी स्वत: गु्रप सोडल्याचे दिसत आहे. कांही जणांनी जुन्या गु्रपवर आपले विचार व्यक्त करतांना चुकीचे घडत आहे असे शब्द लिहिले आहेत. कालपर्यंत अध्यक्ष सांगत होते की, मला व्हॉटसऍप गु्रप वापरण्याचे जास्त कळत नाही. पण आता त्यांनी स्वत:चा आपला वेगळा व्हॉटसऍप गु्रप तयार केला आणि आपण वेगळे झाल्याचे दाखवून दिले.तसेच नांदेड खंडेलवाल समाज जो गु्रप सन 2015 मध्ये तयार झाला होता त्यातून अध्यक्ष लेफ्ट झाले आहेत. जुन्या गु्रपमध्ये द्वारकादास शर्मा, धिरज शर्मा, पियुश शर्मा यांनी नवीन गु्रप तयार झाल्यामुळे समाजाची स्थिती काय झाली याचे आपल्या शब्दात वर्णन केले आहे. सोबतच इतरही अनेक जणांनी जुना गु्रप सोडला आहे. कांही जणांनी नवीन गु्रप सुध्दा सोडला आहे. एकंदरीत या गटांमध्ये तयार झालेली परिस्थिती वास्तव न्युज लाईव्हचे वृत्त सत्य होते हेच दाखवते.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2022/07/23/रिमोट-कंंट्रोलवर-चालणारी/