दोन वर्ष महिलेवर अत्याचार करून १४ लाख ७० हजार लांबवणारा पोलीस कोठडीत

नांदेड,(प्रतिनिधी)- दोन वर्ष महिलेचा संपूर्ण उपभोग घेऊन तिचे १४ लाख ७० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन ऑक्टोबर २०२१ पासून पळून गेलेल्या २७ वर्षीय युवकाला विमानतळ पोलिसांनी पकडून आणल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी त्यास चार दिवस अर्थात २९ जुलै २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने ६ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुली आहेतएकीचे लग्न झाले आहे.दुसरी १० वर्षय वयाची आहे.तिच्या पतीचे निधन सन २०१५ मध्ये झाले होते.त्यांच्या घरी महावीर विठ्ठल साळवे (२७) हा एका खोलीत भाडेकरू होता.त्याचे भाडे १५०० रुपये महिना होते.सन २०२१ मध्ये गट क्रमांक १४४, मधील भूखंड क्रमांक १६४,१६५,१६६ मध्ये महिला राहायला होती.फेब्रुवारी २०१९ मध्ये एकदा महावीर साळवे चालक कार्य पूर्ण करून घरी आला आणि मला आवाज दिला.मी गेले तेव्हा बळजबरी करून माझ्यावर अत्याचार केला.मला सांगितले की कोणास सांगितले तर तुझीच बदनामी होईल. पुन्हा अनेकदा तुझ्या सोबत लग्न करतो म्हणून माझ्यावर अनेकदा अत्याचार केला. भूखंड क्रमांक १६४,१६५,१६६ विक्री करून जमलेले १ ४लक्ष रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन एका दिवशी महावीर साळवे फरार झाला.

या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९९/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२)(एन) ४२०,४०६,५०६ प्रमाणे दाखल केला.फरार महावीरला विमानतळ पोलिसांनी गंगाखेड येथून पकडून आणले.आज २५ जुलै रोजी सहायक पोलीस निरीक्षक एन.आर.आनलदास, पोलीस अंमलदार रामदास सूर्यवंशी आणि मुंढे यांनी महावीर साळवेला न्यायालयात हजर केले.सरकारी वकील ऍड.रेणुका राय यांनी पोलीस कोठडी मिळण्यासाठी सविस्तर सादरीकरण केले.न्या.जाधव यांनी महावीरला चा दिवस अर्थात २९ जुलै २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *