रेल्वे आरक्षण कार्यालयासमोर एका 75 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

नांदेड(प्रतिनिधी)-23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळ एका 75 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह सापडला आहे. याबाबत वजिराबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.23 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या पुर्वी कधी तरी एक 75 वर्षीय अनोळखी इसम मरण पावलेल्या अवस्थेत आणि नैसर्गिक अवस्थेत आरक्षण कार्यालयाजवळ सापडला. याबाबत वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 53/2022 दाखल केला आहे. या आकस्मात मृत्यूचा तपास पोलीस अंमलदार डी.एस.केंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मरण पावलेला व्यक्ती हा अनोळखी असल्याने त्याचा नातलगांचा शोध घेण्यासाठी वजिराबाद पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. त्यातील वर्णनानुसार मरण पावलेला व्यक्ती 75 वर्षीय असेल. त्याचा बांधा सडपातळ आहे. रंग सावळा आहे. उंची 5 फुट 3 इंच आहे. डोक्याचे केस काळे पांढरे आहेत. या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती द्यावी असे आवाहन वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांना पोलीस ठाण्यातील फोन क्रमांक 02462-236500, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचा मोबाईल क्रमांक 9923696860 आणि डी.एस.केंद्रे यांचा मोबाईल क्रमांक 9970381047 यावर सुध्दा माहिती देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *