नवीन नांदेड (प्रतिनिधी)- श्रावणमास प्रारंभ निमित्याने विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरात महाअभिषेक महापूजा व महाप्रसादाचे आयोजन २८ जुलै रोजी करण्यात आले असून यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्य व काळेश्वर मंदिरात २८ जुलै रोजी अमावस्या निमित्ताने सकाळी महाअभिषेक महापूजा व महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ वाजता करण्यात आले असून यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून ,महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवहान शिवा गिराम ,निळकंठ काळे ,अशोक जोंधळे , बालाजी सोनवणे मामा बोअरवाले,विजय पाटील ,सुनील गट्टाणी ,मनोज चोधरी ,मनोज रावत ,आनंद जोशी ,बालाजीसिंग चव्हाण ,इंदरसिंग परदेशी मठपती स्वामी हॉटेल ईतवारा, मानटोसिंग कापसे, किशन बोईनवाड, महेंद्र तरटे, संदीप छपरवाल, अनिल भद्रे,राशेद भाई सिधदीकी व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रावणमास प्रारंभ निमित्ताने काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे महाप्रसादाचे आयोजन