नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद येथे अग्नीपथ योजनेअंतर्गत सेना भर्ती करावयाची असून त्यासाठी आवेदन पत्र व सुचना पत्र जोडून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना त्यात सहभागी होण्यासाठी प्रसिध्दीच्या माध्यमातून कळवावे असे परिपत्रक अपर जिल्हाधिकारी नांदेड प्रदीप कुलकर्णी यांनी जारी केले आहे.
दि.21 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेले एक पत्र मुख्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, मनपा आयुक्त नांदेड, कमांडींग ऑफीसर, 52 बटालीयन महाराष्ट्र एनसीसी नांदेड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, व्यवस्थापक दुरचित्रवाहिणी , व्यवस्थापक आकाशवाणी यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार भरती निदेशक सेना भरती कार्यालय औरंगाबादचे कर्नल प्रविण कुमार एस यांनी पाठविलेल्या पत्राचा संदर्भ जोडण्यात आला आहे.
या पत्रानुसार दि.31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान औरंगाबाद येथे सेना भरती कार्यालय येथे अग्नीपथ योजनेतील सेना भरती करायची आहे. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून या संदर्भाची प्रसिध्दी करण्यात यावी असे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रात लिहिले आहे.