नांदेड(प्रतिनिधी)-इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला ती अभ्यास करत असलेल्या जागी जावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपीतांपैकी एकाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन 17 वर्षीय बालिकेने 25 सप्टेंबर 2018 रोजी तक्रार दिली की, ती आपले आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहिण असे एकत्रित राहतो. मी माझ्या शेजारी बांधकाम सुरू असलेल्या एका घरात नियमित जाऊन अभ्यास करते. मी कॉलेजला जातांना आणि परत येतांना संजय उर्फ पिंट्या काळबा धोतरे (21) हा मला पाहुन शिट्या वाजवत असे आणि त्याचा मित्र दिपक परसराम गायकवाड हा त्याला मदत करत असे. दि.25 सप्टेंबर रोजी तीने दिलेल्या तक्रारीनुसार 24 सप्टेंबर रोजी आपला अभ्यास करण्यासाठी ती बांधकाम सुरू असलेल्या त्या घरात गेली आणि तेथे अभ्यास करत होती. त्या ठिकाणी संजय धोतरे आला आणि तो मला सांगत होता की तु मला कसे बोलणार नाहीस. याप्रसंगी त्याने लज्जा येईल असे अनेक कृत्य त्याने माझ्यासोबत केले. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला. ते घर रस्त्यावर होते. तेथूनच माझा एक नातलग जातांना पाहिला आणि मग मला सोडले. त्यावेळी त्याने मला मारहाणपण केली. या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 462/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(अ), 323, 506 आणि 34 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक प्रसेनजित जाधव यांनी केला.
प्रसेनजित जाधव यांनी विजय भंग करणारा संजय उर्फ पिंट्या काळबा धोतरे (21) आणि त्याचा सहकारी मित्र दिपक परसराम गायकवाड या दोघांना अटक केली आणि त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात हा खटला विशेष पोक्सो खटला क्रमांक 9/2019 नुसार चालला. या प्रकरणात पाच साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश पांडे यांनी या प्रकरणातील संजय उर्फ पिंट्या काळबा धोतरेला दोषी मानले. त्यास पोक्सो कायद्याच्या कलम 8 प्रमाणे तिन वर्ष शिक्षा आणि दीड हजार रुपये दंड तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 12 नुसार एक वर्ष शिक्षा आणि एक हजार रुपये दंड, भादविच्या कलम 323 साठी तीन महिने शिक्षा आणि 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची एकूण रक्कम 3 हजार रुपये होत आहे. प्रकरणातील दुसरा आरोपी दिपक परसराम गायकवाडची सुटका झाली. शिक्षा झालेला आरोपी संजय धोतरेला सर्व शिक्षा एकत्र भोगायची आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजून ऍड. एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली तर नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.
अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला सक्तमजुरी