नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेडच्या आयटीआय गेटजवळ दोन इसमांनी चाकुचा धाक दाखवून एका सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले आहे.
रामा माणिका बोदमवाड (59) हे सेवानिवृत्त शिक्षक 27 जुलैच्या सायंकाळी 8 वाजता आयटीआय गेट मुदखेड येथे आपले गाव मेंढका येथे जाण्यासाठी ऑटो पॉंईटवर थांबले होते. त्यावेळी एका मोटारसायकल दोन जण आले आणि गावाकडे येता का अशी विचारणा केली. ते लगेच हो म्हणाले आणि त्या दुचाकीवर बसले. पुढे निमुर्नष्य रस्त्यावर नेऊन त्या दोघांनी गाडी थांबविली आणि त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चैन, दोन अंगठ्या आणि दोन मोबाईल असा97 हजार रूपयांचा ऐवल लुटून नेला आहे. मुदखेड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक महेश शर्मा अधिक तपास करीत आहेत.