
नांदेड (प्रतिनिधी)- शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गुन्हेगारांची तपासणी करत असताना मिळालेल्या गुप्त माहिती आधारावर एका 23 वर्षीय युवकाकडून दोन गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस पकडले आहेत.
दि. 27 जुलै रोजी सर्वत्र गुन्हेगारांची तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शिवाजीनगर गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहीम, रवी बामणे, दिलीप राठोड, देवसिंह सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे हे तपासणी करत असताना अण्णाभाऊ साठे चौकामध्ये त्यांना एका युवकाकडे बंदुके असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस पथकाने त्याला थांबून त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडले. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर आणि त्यांच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.