हदगाव येथील डॉक्टराच्या घरी दरोडा टाकणारे तीन आरोपी पाच दिवस पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी)- हदगावमध्ये डॉक्टराच्या घरात तरोडा टाकणाऱ्या तीन जणांना हदगावचे न्यायदंडाधिकारी जितेंद्र जाधव यांनी पाच  दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि. 17 जुलै रोजी रात्री हदगाव येथील अत्यंत प्रतिष्ठीत कुटूंब गंदेवार यांच्या घरात दरोडेखोरांच्या टोळक्याने प्रवेश मिळविला आणि त्या घरातून 71 तोळे सोने आणि 70 हजार रूपये रोख रक्कम असा 40 लाख 70 हजार रूपयांचा ऐवज चोरला होता. स्थानिक गुन्हा शाखेने या दरोडेखोरांमधील दशरथ गंगाराम देवकर (५०) रा.दगडवाडी ता.हदगाव जिल्हा नांदेड, राजू लचीराम देवकर (३९) रा.बटाळा ता.भोकर जिल्हा नांदेड आणि लक्ष्मण पिराजी मेटकर (३३) रा.नांदुसा ता.अर्धापूर जिल्हा नांदेड हल्ली राहणार चौफाळा नांदेड या तिघांना पकडले. त्यांच्याकडून 23 तोळे सोने जप्त केले आहेत. तरी पण या दरोड्यात चोरीला गेलेले आणखीन 48 तोळे सोने जप्त करणे बाकी आहे. या प्रकरणातील इतर दरोडेखोरांना शोध सुरू आहे.या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यात सोने  दागिने 75 तोळे 6 ग्रामचे,चांदीचे दागिने एक तोळा वजनाचे,रोख पाच लाख आणि तीन मोबाईल असा एकूण 31 लाख 80 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता असे लिहिलेले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, आशिष बोराटे, पोलीस अंमलदादारांनी  पकडलेल्या तीन दरोडेखोरांना आज हदगाव न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणातील तपास, इतर आरोपी शोध आणि  दरोड्यातील उर्वरित मुद्देमाल जप्ती या कारणासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली.सरकारी वकील ऍड.शिवराज फाळेगावकर यांनी मांडलेली पोलीस कोठडीची बाजू मान्य करत न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी पोलिसांची विनंती मान्य करीत तीन दरोडेखोरांना पाच दिवसअर्थात 2 ऑगस्ट 2022 पर्यंत  पोलीस कोठडीत पाठविले आहे.
                       आज अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पांडुरंग माने,शिवसांभ घेवारे,पोलीस उप निरीक्षक सचिन सोनवणे,आशिष बोराटे,दत्तात्रय काळे,जसवंतसिंघ शाहू,पोलीस अंमलदार गुंडेराव करले,गंगाधर कदम,मारोती तेलंगे,संजय जिंकलवाड, देवीदास चव्हाण,रवी बाबर, तानाजी येळगे,मोतीराम पवार,विठ्ठल शेळके,गजानन बयनवाड, रुपेश दासरवाड,शंकर केंद्रे,अर्जुन शिंदे,राजेश सिटीकर,दीपक ओढणे, शेख महेजबीन यांचे कौतुक केले आहे.
संबंधीत बातमी ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *