सतरा महिन्यांनी मोबाईल चोर पकडला;शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

नांदेड,(प्रतिनिधी) – तब्बल सतरा महिन्यांनी एक मोबाईल चोर शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने गजाआड करण्याची किमया केली आहे.चोरलेला मोबाईल पण जप्त केला आहे.

दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला आपल्याच घरासमोर मोबाईलवर बोलत थांबली होती.तेव्हा दोन अनोळखी मोटारसायकलस्वार जोरात गाडी चालवत आले आणि तिचा २२९९० रुपये किमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून नेला.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२१ दाखल झाला होता.

आपण चुकीचे कार्य केल्यांनतर अद्दल घडतेच त्यास कधी कधी उशीर होतो.असेच या प्रकरणात घडले. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांना प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार महिलेचा बळजबरी चोरलेला मोबाईल किनवट येथे होता.शिवाजीनगरचे गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम,देवसिंग सिंगल,दिलीप राठोड,रविशंकर बामणे,दत्ता वडजे,शेख अझहर यांनी किनवट येथून नांदेडच्या पंचशीलनगर,झेंडा चौक येथे राहणारा चंद्रमुनी देविदास खाडे (२४) यास ताब्यात घेतले.त्याने महिलेचा बळजबरीने हिसकावलेला २२९९० रुपये किमतीचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोल्सी अधीक्षक निलेश मोरेस्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी शिवाजीनगर पोलिसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *