नांदेड (प्रतिनिधी)- तामसा येथे दोन ठिकाणी दरोडेखोरांनी घरात घुसून मारहाण करत जवळपास 4 लाख 95 हजार 600 रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. या प्रकरणात अनेकांना गंभीर ईजा झाली आहे.
तामसा शहरातील नरसिंह मंदिराजवळ घर असलेले धनंजय शालीक महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचे दार तोडून अनेक दरोडेखोरांनी त्यांच्याघरात प्रवेश केला. त्यांना दमदाटी करून त्यांच्या बॅगमधील 2 लाख रूपये रोख, खिशातील 50 हजार रूपये, सोन्याच्या दोन अंगठ्या 95 हजार 600 रूपयांच्या तसेच शिक्षक कॉलनीमधील बालाजी माने यांच्याही घरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून सोन्याचे दागिने 1 लाख 50 हजार रूपयांचे असा ऐवज लुटून नेला आहे. तामसा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक उजगरे करीत आहेत.