नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजिराबाद, इतवारा आणि भाग्यनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 1 लाख 5 हजार रूपये किंमतीच्या 3 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
सचिन बाबुराव बंडेवार यांची 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 बी.जी. 7464 ही 27 जुलै रोजी दुपारी 4.30 ते रात्री 9.30 या वेळेदरम्यान रयत दवाखाना सोमेश कॉलनी येथून चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार अनिल झांबरे अधिक तपास करीत आहेत.
शेख जावेद शेख लतिफ यांनी दि. 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता राज कॉर्नर, मामा यांच्या हॉटेलसमोर आपली 40 हजार रूपये किंमतीची गाडी क्र. एम.एच. 26 बी.एस.5696 उभी केली होती. 15 मिनीटांत ही गाडी चोरीला गेली. भाग्यनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद मियॉ मोहम्मद पाशा यांनी 18 जुलै रोजी रात्री 7 वाजता आपली दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 बी.एल. 5333 ही आपल्या घरासमोर उभी केली होती. मध्यरात्रीनंतर 19जुलै रोजी 3 वाजेच्या सुमारास ही 35 हजार रूपये किंमतीची दुचाकी गाडी मन्यार गल्ली येथून चोरीला गेली आहे. इतवारा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार दासरवार अधिक तपास करीत आहेत.