शिवाजीनगर पोलिसांनी २४ तासात ६ लाखांचा चोरीचा ऐवज जप्त केला

नांदेड,(प्रतिनिधी)- दोन ते तीन टन वजनाचे साहित्य चोरून हैद्राबाद येथे घेऊन गेलेल्या चोरट्याला शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने २४ तासात पकडून आणले आहे आणि चोरलेला ऐवज सुद्धा जप्त केला आहे.

नांदेडमध्ये सर्वत्र सार्वजनिक रस्त्यांची कामे सुरु आहेत.त्यातील अनेक मोठ्या वजनाचे साहित्य रस्त्यावरच ठेवलेले असते.प्रदीप किशन बाविसकर यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कंपनीचे एक पोकलेन नाईकी नगर हद्दीतील चौकात रात्री ठेवलेले होते. त्यातील २-३ वजनाचे ब्रेकर कोणीतरी चोरून नेले आहे.याबाबत गुन्हा क्रमांक २८५/२०२२ दाखल झाला.गुन्हा घडताच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले.प्राप्त झालेल्या माहितीनुसार चोरलेले साहित्य हैद्राबाद येथे जात आहे.तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम,दिलीप राठोड,रविशंकर बामणे, देवसिंह सिंगल,शेख अझहर,दत्ता वडजे यांना हैद्राबादला पाठवले.पोलीस पथकाने तेथून चोरलेल्या ६ लाखांच्या साहित्यासह किरण ज्योतिबाराव बल्लाळ रा. मनाठा ता.हदगाव जिल्हा नांदेड यास २४ तासात पकडून नांदेडला आणले आहे.या जबरदस्त कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी शिवाजीनगर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. पकडलेल्या बल्लाळला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *