नांदेड,(प्रतिनिधी)-साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ व्या जयंती निमित्ताने जिल्हा नांदेड आम आदमी पार्टी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२वी जयंती सार्वत्रीक साजरी करण्यात आली आहे.या जयंती निमित्ताने नांदेड नवामोंढा परिसरातील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाक्रतीपुतळा पुतळ्यास पुष्पहार नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कदम यांच्या हास्ते अर्पण करण्यात आला.यावेळी पार्टीचे सरचिटणीस डॉ. अवधुत पवार, नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभाप्रमुख. अँड जगजीवन भेदे, अँड. रितेश पाडमुख, युवाजिल्हाध्यक्ष अजित पाटील, डॉ. शुभम महाजन अँड. प्रविण निखाते.यांच्या सह असंख्य कार्यक्रते यांनी उपस्थित राहुन अभिवादन केले.