नविन नांदेड(प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यी जयंती सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे वतीने सिडको येथील टिनशेड येथे १ आगसषट रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करून मिठाई वाटप करण्यात आली.
प्रांरभी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार जनार्दन गुपीले, नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रमेश तालीमकर, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे, जेष्ठ विक्रेते शेख सयोधदीन, मदनसिंह चव्हाण, दौलतराव कदम यांच्या सह अनिल धांंवडे,राम धांवडे, अमोल नांदेडकर, गणेश ठाकूर, साईनाथ गोटमवार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन वृत्तपत्र विक्रेते गणेश कांबळे,तातेराव वाघमारे यांनी केले होते, यावेळी मिठाई चे वाटप वृत्तपत्र विक्रेते व पदाधिकारी यांना करण्यात आले.