एका आत्महत्येप्रकरणी टहेलसिंघ शाहू आणि अमरसिंघ कामठेकरला पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- न्यायालयाच्या कार्यवाहीची धमकी देऊन एका व्यक्तीला आत्महत्येपर्यंत पोहचविणाऱ्या दोघांविरूद्ध ऍट्रोसिटी कायद्यासह भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पकडलेल्या दोघांना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, मंजुबाई भोलासिंग परमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडील काही जागेच्या वादातून तयार झालेल्या प्रकरणात भोलासिंग परमारला त्याच्या सासू चंदाबाई यांच्या नावावर असलेली जागा बेकायदेशीररित्या कब्जा करण्याच्या उद्देशाने त्रास दिला. तसेच कोर्टकचरी करण्यास भाग पाडून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी नोंद आत्महत्येपूर्वी भोलासिंग परमारने एका चिठ्ठीत लिहून ठेवली होती. हा प्रकार सन 2017 ते 1 जुलै 2022 पर्यंत सुरू होता. आत्महत्येचा प्रकार मुरमुरा गल्लीजवळ घडला होता. मंजुबाईच्या तक्रारीनुसार या प्रकरणात टहेलसिंघ लक्ष्मणसिंघ शाहू वय 52 आणि अमरसिंघ शेरसिंघ कामठेकर वय 64 हे दोघे जबाबदार आहेत. यातील अमरसिंघ हे भुमी अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले व्यक्ती आहेत. अमरसिंघ कामठेकर यांना लाचलुचपत प्रकरणात शिक्षा सुद्धा झालेली आहे. घडलेला प्रकार हा ज्या जागेसाठी होता त्या जागेबद्दल सुद्धा बरेच वाद होते.

मंजुबाईच्या तक्रारीनुसार त्या अनुसूचित प्रवर्गातील आहेत. त्यानुसार वजिराबाद पोलिसांनी टहेलसिंघ शाहू आणि अमरसिंघ कामठेकर या दोघांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 34 आणि ऍट्रासिटी कायदा कलम 3 (1) (एफ), 3 (1) (जी) नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीमान चंद्रसेनजी देशमुख साहेब यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु आज ते सुट्टीवर गेल्याने सध्या या गुन्ह्याचा तपास इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. टहेलसिंघ शाहू आणि अमरसिंघ कामठेकर या दोघांना काल दि. 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

आज 2 ऑगस्ट रोजी डॉ. सिद्धेश्वर भोरे, त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी शिवराज जमदडे आणि पोलीस अंमलदार,प्रदीप कांबळे , बबन बेडदे, प्रदीप भद्रे यांनी पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले.जिल्हा सरकारी आभियोक्ता अँड आशिष गोदमगांवकर  यांनी पोलीस कोठडी देणे कसे न्यायाधीश एस. इ. बांगर यांनी या दोघांना चार दिवस अर्थात ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *