नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड शहरात जुगार अड्ड्यावर पडलेला दरोडा हा खरा नव्हता, तर एका माणसाची लूट झाली होती, या बाबतचा गुन्हा दोन दिवसांनी दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा अत्यंत विद्युत गतीने काम करून स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला. त्या गुन्ह्यात पडलेल्या दरोड्यातील 50 हजार रूपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असा 60 हजार रूपयांचा ऐवज सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार राजेश बार ऍन्ड रेस्टारंट मुखेड येथे पडलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपी कुठे आहे. त्यानुसार त्यांनी अमित शेषराव गोडबोले रा. सहयोगनगर नांदेड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा गुन्हा मी, आवेज उर्फ अबू महेबुब शेख रा. खुदबईनगर, गब्बरसिंघ उर्फ गब्बू जसविंदरसिंघ तिवाना रा. भगतसिंग रोड आणि आकाश राजेश करनाळे रा. कौठा नांदेड असे सर्व आणि सोबत इतर पाच जणांनी मिळून केला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात 392 कलम आहे. आता ती 395 करावी लागणार आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने अमित गोडबोलेकडून लुटलेल्या साहित्यातील 50 हजार रूपये रोख आणि 10 हजार रूपये किंमतीचा एक मोबाईल असे 60 हजारांचे साहित्य जप्त केले आहे. तो गुन्हा क्र. 224/2022 दाखल झाला तेव्हा त्यात 18 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरीला गेल्याची तक्रार राजेश बारचे मालक राजेश शंकरराव गज्जरवाड यांनी दिली होती.
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, भोकरचे अत्यंत तडफदार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस पांडूरंग माने, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, कानाजी येळगे, विलास कदम आणि हेमंत बिचकेवार यांनी ही कामगिरी केली आहे.