नांदेड (प्रतिनिधी)- वजिराबाद पोलिसांनी एका दुकानातून 13 तलवारी आणि 8 खंजीर अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.
वजिराबाद पोलिसांनी एका दुकानात धाड टाकली. ती दुकान चरणसिंघ हॅन्डी क्राफ्ट या नावाची आहे. या दुकानाचे मालक सुरजितसिंघ गुरूचरणसिंघ सिद्धू वय 48 हे आहे. या दुकानातून पोलिसांनी 1 ऑगस्ट रोजी13 तलवारी आणि 8 खंजीर जप्त केले आहेत. या हत्याराची किंमत 24 हजार रूपये आहे. सुरजितसिंघ सिद्धू विरूद्ध गुन्हा क्र. 262/2022 हत्यार कायद्याचे कलम 4/25 आणि 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
ही कार्यवाही करताना पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड,शेख इमरान, रमेश सुर्यवंशी, शुभांगी कोरेगावे आदींनी हा छापा टाकला होता. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी वजिराबाद पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.