नांदेड (प्रतिनिधी)- दि. 31 जुलै रोजी आपल्या वयोमर्यादेप्रमाणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या 6 पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या समक्ष निरोप देण्यात आला.
पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक भुमन्ना मारोती आचेवाड (नियंत्रण कक्ष), सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रमोहन मारोती जोंधळे, भानुदास गणपती चव्हाण, केशव रामराव हाके (पोलीस मुख्यालय), पोलीस अंमलदार दिलीप काशीनाथ कांबळे (पोलीस ठाणे मनाठा), ईब्राहीम लालमोहम्मद पिंजारी (पोलीस ठाणे उमरी) हे आपल्या वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले. त्यांना 1 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, गृह पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, कमल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पिंपरखेडे तसेच अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समक्ष सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस अंमलदार राखी कसबे आणि रूपा कानगुले यांनी केले.